पनवेल: रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, पनवेल महानगरपालिका व पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांनी तयार केलेल्या रोटरी गणेश विसर्जन तलावात दीड दिवसाच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सेक्रेटरी अनिल ठकेकर, माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, प्रोजेक्ट चेअरमन दीपक गडगे, यांचेसह अनेक रोटरी सदस्य सर्व गणेश भक्तांना नियोजनबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करीत होते. या प्रसंगी मा. सभागृह नेता परेश ठाकूर, मा. उपमहापौर विक्रांत पाटील, मा.विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, मा. नगरसेविका रुचिता लोंढे,मा. नगरसेविका प्रीती जार्ज, गणेश कडू आदी मान्यवर उपस्थित होते. पनवेल शहर पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक संतोष शेटे, पोलीस निरीक्षक शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी अधिकारी, महिला पोलीस व ट्रॅफिक पोलीस यांनी चोख बंदोबस्त व्यवस्था ठेवली होती. पनवेल महानगरपालिका आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तलावाची स्वच्छता व निर्माल्य गोळा करण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती तसेच पनवेल महापालिके द्वारे प्रथमोपचार सेवा व्यवस्था करण्यात आली होती.
आज पनवेल मधील हजारो गणेशभक्तांसह काही परदेशी पाहुण्यांनी या गणेश विसर्जन सोहळ्याचा आनंद घेतला.
या विसर्जन तलावावर रात्री ११ .३० पर्यंत सुमारे १२४२ गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या.