पनवेल दि.०२ (संजय कदम) : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल परिसरात असलेल्या मानवी हक्क संरक्षण फेडरेशन च्या कार्यालयातील गणेशाचे घेतले दर्शन त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी गणेशोत्सव काळात पनवेल परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या घरगुती व सार्वजनिक गणेशाचे दर्शन घेतले. त्याचवेळी त्यांनी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या कार्यालयाला भेट देत गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी तेथील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या हस्ते श्रींची आरती सुद्धा घेतली.
फोटो : जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचा करण्यात आलेला सत्कार