कामगार नेते महेंद्रजी घरत हे कामगार क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असतांना स्थानिक पातळीवरही कामगारांवर आपल्या कामाची छाप पाडताना नेहमीच दिसत आहेत त्यामुळेच कामगारांचा ओढा त्यांच्याकडे वाढत आहे.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, इंटकचे राष्ट्रीय सचिव, ITF या बहुराष्ट्रीय संघाचे उपाध्यक्ष अशी पदे भूषवित असल्यामुळे कामाचा व्याप वाढला आहे त्यामुळे नवीन कंपन्यांतील नामफलक अनावरणासाठी कामगारांना प्रतीक्षा करावी लागते याची जाणीव त्यांना आहे.
दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी एकाच दिवशी संघटनेच्या तीन कंपन्यांमध्ये, मे. इकोग्लोब पॅकेजिंग पेण, MIDC सुरक्षा रक्षक रसायनी, मे. रुबी मिल खरसुंडी खालापूर येथे नामफलकाचे अनावरण संघटनेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, कामगारनेते महेंद्रजी घरत यांच्या शुभहस्ते तसेच पेण तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. अशोक मोकल, खालापूर तालुका अध्यक्ष श्री. कृष्णा पारींगे, माजी उपसभापती वसंत काठावले, संघटनेचे सरचिटणीस श्री. वैभव पाटील, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष श्री. निखील डवळे, यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
बऱ्याच कंपन्यांतील कामगारांना किमान वेतन दिले जात नाही, हायर अॅन्ड फायर केले जाते; महिला कामगारांना हिण वागणूक दिली जाते. बोनस दिला जात नाही, तडकाफडकी कामावरून काढले जाते या सर्व समस्यांना कंटाळून या कंपन्यांतील कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे.
सर्व कामगारांना सन्मानाची वागणूक व न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही त्यासाठी साम- दाम – दंड – भेद वापरून कामगारांना न्याय मिळवून देऊ असे यावेळी कामगार नेते महेंद्र घरत यांनी कामगारांना आश्वासित केले.
याप्रसंगी पेण शहर कॉंग्रेसचे प्रवीण पाटील, सदानंद म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, अविनाश भोईर, मनोज विचारे, रोहित म्हात्रे, वैभव म्हात्रे, राजीव पाटील, विदु कुंभार, दत्तात्रेय शिंदे, संतोष ठोंबरे तसेच संघटनेचे संघटक – योगेश रसाळ, अरुण म्हात्रे, दिपक ठाकूर, आदित्य घरत, राजेंद्र भगत, विवेक म्हात्रे व शेकडोंच्या संख्येने कामगार उपस्थित होते.
Tags
पनवेल