पनवेल दि २५ (संजय कदम ) : पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने दोन वेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात गावठी हात भट्टी दारूचा साथ हस्तगत केला आहे,
तालुक्यातील कातकरी वाडी चेरेवली येथील दोन वेगवेगळ्या ठिकाणी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दैडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन टाकळे, पोहवा संतोष चिकणे आदींच्या पथकाने छापा टाकून एका ठिकाणाहून ७०० रुपये किमतीचा गावठी हात भट्टीचा दारुचा साठा हस्तगत केला आहे,
तर याच पथकाने दुसऱ्या ठिकाणी छापा टाकून जवळपास एक हजार रुपये किमतीचा गावठी हात भट्टी चा साठा हस्तगत केला आहे या दोन छाप्या मुळे बेकायदेशीर रित्या गावठी दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
Tags
पनवेल