पोलीस अंमलदाराच्या प्रामाणिकपणाचा सन्मान!






पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः  जवळपास दिड लाख रुपयाचे सापडलेले दागिने परत करणार्‍या प्रामाणिक पोलीस अंमलदारांचा पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.



नवी मुंबई पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर असणारे अंमलदाराच्या सुधाकर पाटील यांना जवळपास दीड लाख किंमतीचा ऐवज रस्त्यावर सापडला. त्यांनी संबंधित ज्वेलर्सकडे येऊन ते दागिने  ग्राहकाला परत दिला. 


पाटील यांच्या प्रामाणिकपणाचा विजयादशमीच्या मुहूर्तावर छोटासा सन्मान  पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दौलत शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला व त्यांच्या प्रामाणिकपणाला कडक सॅल्युट केला.  ः


थोडे नवीन जरा जुने