दिवाळी पहाट निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाचे अनावरण





पनवेल दि.२५ (वार्ताहर) : दिवाळी पहाट निमित्त पनवेल मधील महात्मा फुले मार्गावरील जुन्या पोस्टाजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाचे अनावरण डॉ. बुधकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
या सोहळ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दिनेश मांडवकर, योगेश चिले, अतुल चव्हाण, पराग बालड, संजय मुरकुटे, विश्वास पाटील, विद्याधर चोरगे, अनिकेत मोहिते, अवधूत ठाकूर, गणेश गायकर तसेच अनेक महाराष्ट्रसैनिक आणि श्रीकृष्ण मित्र मंडळ, कट्टा परिवार, पोस्ट ऑफिस रिक्षाचालक संघटना, स्थानिक दुकानदार, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. 


या सोहळ्याचे आयोजन अनिमेष ओझे (मनसे विद्यार्थी सेना, रायगड जिल्हाध्यक्ष- उत्तर), संदीप पाटील (विभाग अध्यक्ष , प्रभाग क्र.१९),सचिन सिलकर (मार्गदर्शक - महाराष्ट्रसैनिक),मंदार पाटणकर (मार्गदर्शक - महाराष्ट्रसैनिक), केदार सोमण (मार्गदर्शक - महाराष्ट्रसैनिक), पनवेल विद्यार्थी सेनेचे अभि रिंगे, आकाश गाडे व हिमांशु पाटील ह्यांच्यातर्फे करण्यात आले होते.

थोडे नवीन जरा जुने