पनवेल, जुई (कामोठे) येथील विद्यमान साहित्यिक कवी सुरेश भोपी यांच्या "वज्रमूठ" काव्य-संग्रहास राष्ट्रीय पुरस्कार.पनवेल दि. १३(वार्ताहर): विद्यार्थी प्रिय शिक्षक संघटना, शब्दगंध, प्रकाशन आणि अम्रपाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा 'बेस्ट रायटर'नॅशनल अवॉर्ड यंदा श्री. सुरेश कृष्णा भोपी, जुई (कामोठे), पनवेल, रायगड यांच्या वज्रमूठ " या काव्य-संग्रहाला मिळाला आहे.
मौलाना आझाद रिसर्च सेंटर, औरंगाबाद येथे झाला. सिनेअभिनेत्री रुपाली पवार, यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सुरेश भोपी यांना गौरविण्यात आले.
त्यावेळी अरुण घोडेराव, आनंद अहिरे, सदीप त्रिभुवन, लखन काशिकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या यशाबद्दल पनवेल महानगरपालिका माँ. सभापती (नगरसेवक) श्री. विकास घरत व सहकारी यांनी अभिनंदन केले
Tags
पनवेल