मराठा उद्योजक सारथी या संघटनेतर्फे विनातारण व्यावसायिक कर्ज मार्गदर्शन शिबीर





पनवेल दि.०४ (संजय कदम) : मराठा उद्योजक सारथी या संघटनेतर्फे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ माध्यामातून मराठा समाजातील उद्योजक / व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या व्यावसायिक कर्ज परतावा योजने अंतर्गत विनातारण व्यावसायिक कर्ज मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. 



हे शिबीर शनिवार ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७:३० वाजता, उत्कर्ष सभागृह, खारघर, नवी मुंबई येथे होणार आहे. 



या शिबिरात नॅशनल को. ऑ. बँकचे सह-महव्यवस्थापक बाळासाहेब पवार आणि त्यांची टीम उपस्थित राहून सहभागी उद्योजक / व्यावसायिकांना या कर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज दाखल करण्याची पद्धत यावर संपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.


 तसेच सीए किरण भोसले हे कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रोजेक्ट रीपोर्ट, उद्देशीय पत्र इत्यादी विषयांवर माहिती देणार आहेत. तरी जास्तीत जास्त मराठा समाजातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि या शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा उद्योजक सारथी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.



थोडे नवीन जरा जुने