रखडलेल्या पनवेल एस टी स्थानकातील प्रकल्प उभारणीसाठी नानाभाऊंचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लवकरच होणार आर - पारची बैठक.








प्रतिनिधी...

तब्बल ४ एकर विस्तिर्ण भूखंडावर पसरलेले पनवेल एस टी स्थानक परिसरात बांधा व हस्तांतरित करा या धर्तीवर अद्ययावत स्थानक संकुल उभारणीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. कोकण आणि मुंबई विभागांना जोडणाऱ्या या अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानकामध्ये रोज ४००० बस गड्यांची ये-जा होत असते.

 प्रशासकीय मान्यता मिळून ५ वर्षे होऊन देखील अद्याप काम सुरू झालेले नाही.सदरचा प्रकल्प व्हावा यासाठी पनवेल प्रवासी संघ या संघटनेने अथक परिश्रम घेतले आहेत.मुळात पनवेल स्थानकातील मुख्य इमारत धोकादायक परिस्थितीत असल्याचा ठपका ठेवत २००९ साली पाडली आहे.

त्यामुळे येथील प्रवासी नागरिक अनेक असुविधांना सामोरे जात आहेत.पायाभूत सुविधांच्या अभावामुळे जनता त्रस्त आहे. या संदर्भात पनवेल प्रवासी संघाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना पत्र लिहून सदरच्या रखडलेल्या प्रकल्पाच्या उभारणी बाबत अवगत केले.


         पनवेल प्रवासी संघाचे पत्र प्राप्त होताच नानाभाऊ पटोले यांनी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्याशी तात्काळ चर्चा केली. अभिजीत पाटील यांनी
तब्बल ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलवासियांना अद्ययावत स्थानिक संकुल उभारणीची प्रशासकीय मान्यता मिळाल्याची खुशखबर मिळाली.

 दुर्दैवाने या खुशखबरीचे प्रकल्पामध्ये रूपांतर होऊ शकलेले नाही. त्यामुळे अगोदरची नऊ आणि मान्यता मिळाल्यानंतर ची पाच अशा १४ वर्षांचा वनवास पनवेल ची जनता भोगत आहे असे सांगितले.
       अपुरी स्वच्छतालये, गळक्या फुटक्या निवारा शेड,खड्डेमय स्थानक आवार,कर्मचाऱ्यांची अपुरी व्यवस्था,मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये थाटलेली डेपो व्यवस्थापक,अधिकारी,लिपिक यांची कार्यालये अशा अनेक समस्यांचे जंजाळ सध्या पनवेल स्थानकात आहे, या विदारक परिस्थितीचे विस्तृत विवरण अभिजीत पाटील यांनी नानाभाऊ पटोले यांना करून दिले.




 नानाभाऊ पटोले यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सदरचा प्रकल्प का रखडला आहे? त्याबाबत आढावा घेण्यासाठी किंबहुना जाब विचारण्यासाठी परिवहन मंत्रालयासोबत बैठक आयोजित करण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
        लवकरच याबाबत सकारात्मक बैठक होऊन हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गे लागण्या संदर्भात मी जातीने पाठपुरावा करणार असल्याचे देखील नानाभाऊ पटोले यांनी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने