पनवेल तालुका विधी सेवा, समिती व पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन 2023 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून *वीर वाजेकर फुंडे महाविद्यालय , उरण येथील मराठी विषयाचे प्राध्यापक मा.श्री.चिंतामण धिंदळे* उपस्थित होते. मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, बोलीभाषांचे महत्त्व, अभिजात भाषेच्या दर्जा संदर्भात मराठी भाषेची सद्यस्थिती, अशा अनेक विविध पैलूंच्या अनुषंगाने त्यांनी विषयाची मांडणी केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री.जयराज वडणे ( अध्यक्ष,तालुका विधी सेवा समिती, पनवेल तथा जिल्हा न्यायाधीश, पनवेल ) यांनी भूषविले. विचारपीठावरती न्यायालयातील सर्व न्यायाधीश महोदय उपस्थित होते. पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. वकील बंधू-भगिनींनी आणि कर्मचारी वर्गांने या कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना विधी स्वयंसेवक शैलेश कोंडसकर यांनी केली.
Tags
पनवेल