झोपेत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल लांबवला


पनवेल दि.२० (वार्ताहर) : झोपेत असलेल्या प्रवाशाचे मोबाईल लांबवल्याची घटना मुंबई ते पनवेल लोकल रेल्वे प्रवासात घडली आहे. अधिक जाधव हा प्रवाशी मुंबई येथून कोपरखैरणे येथे जाण्यासाठी पनवेल लोकल रेल्वेत बसला होता. परंतु त्याला प्रवासादरम्यान झोप लागल्याने तो अंतिम स्थानक पनवेल येथे पोचल्यावर त्याला जाग आली असता त्याच्या खिशातील मोबाईल कोणीतरी अज्ञात इसमाने काढून घेतल्याने त्याने याबाबत पनवेल रेल्वे पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे.


थोडे नवीन जरा जुने