मराठी राज्य भाषा दिना निमित्त विमला तलाव येथे कवी संमेलनाचे आयोजन.उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी राज्य भाषा दिन असल्यामुळे तसेच मराठी भाषेचे सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत उरण शहरातील विमला तलाव गार्डन( श्री दत्त मंदिराच्या पाठीमागे )येथे तालुका स्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कवी संमेलनाचे उदघाटक म्हणून जेष्ठ साहित्यिक एल. बी.पाटील(सदस्य- महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ )यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच जेष्ठ कवी, प्रतिष्ठित मान्यवरांचेही यावेळी उपस्थिती असणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगत मराठी भाषा अधिक वृद्धिंगत करणाऱ्या या कवी संमेलनाला जास्तीत जास्त भाषा प्रेमी, रसिक, नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने