शिव शंकर मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा




काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १८  फेब्रुवारी, तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आली विषेश करुन तालुक्यातील असलेल्या पुरातन शिवमंदिरात काल पासून विविध मंदिरात सजावट सुरु होती.


शंकर म्हणजे भक्तांचे श्रद्धास्थान यामुळे तालुक्यातील असलेल्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भक्तांची मांदियाळी होती. त्याच समवेत काही ठिकाणी या महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जणू या ठिकाणी जत्रेसारखे स्वरूप प्राप्त झाले होते.पाताळगंगा हा परिसरात विविध ठिकाणी पुरातन मंदिर आहे,इसांबे येथिल शिव मंदिर,चौक तुपगांव येथिल धानेश्वर मंदिर,पाताळगंगा नदिच्या किनाऱ्यावर बसलेले रसवेश्वर मंदिर तसेच गुळसुंदे येथिल प्राचिन शिवमंदिर तसेच नव्याने निर्माण झालेल्या वाशिवली येथिल शिव शंकराच्या मंदिरात भक्तांनी दर्शन घेण्यासाठी लगबग सुरु होती.



          शंकर म्हणजे भोला की आपण केलेली भक्तीवर लगेच प्रसन्न होवून आपल्याला आशीर्वाद देत असतो.यामुळेच प्रत्येक मंदिरात दर सोमवारी भक्तगण दर्शन घेण्यासाठी जात असतात.मात्र आज महाशिवरात्र हा दिवस वर्षातून एकदाच येत असल्यामुळे प्रत्येक जण आपल्याला शक्य होइल त्या ठिकाणी जावून भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले गेले.विशेष म्हणजे या दिवशी घेतलेले दर्शनी फलदायी ठरत असून आपल्या मनोकामना पुर्ण होत असतात.म्हणून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या मंदिरात भक्तगण मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत होते.




थोडे नवीन जरा जुने