पनवेल दि २३ (वार्ताहर) : मोबाईल हिसकावून चोरटा पसार झाल्याची घटना रेल्वे प्रवासादरम्यान घडली आहे.
रेल्वे प्रवासी दत्तात्रेय जाधव हे पनवेल येथून बेलापूर येथे कामासाठी जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून तो पसार झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.