पनवेल दि ०२, (संजय कदम) : शिवशाही बस मधून एका महिला प्रवाशाचा महागडा लॅपटॉप व बॅग असा मिळून जवळपास ५० हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना पनवेल जवळील पळस्पे फाटा येथे घडली आहे.
सौ. विना चंदनानी (वय ४९) या ठाणे येथून शिवशाही बस ने पुणे येथे जाण्यासाठी प्रवास करीत असताना पळस्पे फाटा याठिकाणी ए. जी. जाजल पेट्रोल पंपात इंधन भरण्यासाठी बस उभी राहिली असता बस मध्ये प्रवास करणाऱ्या एका अज्ञात प्रवाश्याने विना चंदनानी यांच्या लगेच रॅक मध्ये ठेवलेला त्यांचा महागडा लॅपटॉप व बॅग लंपास केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Tags
पनवेल