माजगांव आदिवासी वाडी च्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन





काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १२ फेब्रुवारी,  गाव तिथे विकास हे समीकरण निर्माण  करून अनेक गावामध्ये विकास कामांची गंगा निर्माण केली आहे.नागरिकांची समस्या जाणून घेवून ती पूर्ण करण्यात येत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.विशेष म्हणजे ग्रूप ग्राम पंचायत माजगांव हद्दीत असलेली माजगांव अदिवासी वाडी या ठिकाणी डोंगराळ भागात वास्तव्ये करणारे त्यांची ही समस्या सरपंच गोपीनाथ जाधव यांना सातत्याने जाणवत असल्यामुळे आमदार महेश बालदि यांच्या आमदार निधीतून हा रस्ता पूर्ण करण्यांचे आश्वासन देण्यात आले होते.आणी आज या कामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आले.


            या ठिकाणी डांबरीकरणांचा रस्ता आहे.मात्र या रस्त्यांची दुरावस्था निर्माण झाल्यामुळे  आदिवासी बांधव यांना दळणवळण करण्यात अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे,गाव तेथे उत्तम दर्जाचे रस्ते झालेच पाहिजे हे समीकरण निर्माण करून,त्यांनी अनेक गावामध्ये विकास कामाचा झंझावत निर्माण  केला आहे. माजगांव अदिवासी वाडीच्या रस्त्याचे कॉंक्रिटिकरण करण्यात येत असल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमीपूजन करण्यात आले.


             यावेळी ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच - गोपीनाथ जाधव,उप सरपंच - कल्पना वाघे,माजी उप सरपंच - नितिन महाब्दि,आर.पी.आय. रायगड जिल्हा कार्याध्यक्ष - अविनाश कांबळे,उद्योजक - राजेश जाधव,नरेश पाटील, सी.आर.पी.महिला बचत गट अध्यक्ष - कमल जाधव,जयवंत पाटील,भरत पाटील,जयेश पाटील,आत्माराम जाधव,जनार्दन जाधव,विलास कांबळे,नामदेव वाघे,मिलिंद गायकवाड,वैभव दिवाणे,गणेश वाघे,कमलाकर वाघे,सरीता वाघे,मिरा वाघे,अनंता वाघे,विनायक शिंदे,अक्षय जाधव,अदि महिला वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




थोडे नवीन जरा जुने