चार्‍या च्या शोधात मेंढपाळांची भटकंती आठ महिने करावे लागतो खडतर प्रवास

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा :१३ फेब्रुवारी , ग्रामीण भागात तालुक्याच्या ठीकांणी मेंढपाळांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आगमन जरी होत असले तरी चा-याच्या आभावाने मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे.हि वस्तूस्थिती सध्या तालुक्याच्या ठिकाणी निर्माण झाली आहे. पुर्वी कोकणात मोठ्या प्रमाणात चारा असायचे,मात्र गेल्या काही वर्षात औद्योगिकरणांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याने ,शिवाय जंगले नामशेष होत असल्यामुळे,त्याच बरोबर पावसाला संपताच वणवे मोठ्या प्रमाणात लागले जात असल्यामुळे,या सर्व कारणावरुन मेंढ्यावर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे.त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या तिव्रतेने जाणवत आहे.पुर्वी माळरान आणी डोंगराच्या परिसरात काटेरी वनस्पती मोठ्या प्रमाणात असायचे,हेच अन्न म्हणून शेळ्या ,मेंढ्या भक्षण करीत असे,यामुळे दुध उत्पादन वाढ होत होती.मात्र चा-याच्या अभावाने आम्ही आर्थिक संकटात सापडत आहोत. पावसाळा संपताच घाटमाथ्या वरिल असलेले मेंढपाळ आपल्या जवळ असलेला लावाजावा घेवून कोकणात येत असतात.आणि पशुधन जगविण्यासाठी आम्ही कोकणाच्या परिसरात भटकंती करीत असतो.याच बरोबर आमचे जितराबाचे लोंढेच्या लोंढे आमच्या बरोबर असून, शेळ्या मेंढ्यांच्या घोळक्यात घोडे, कुत्रे,कोंबड्या असा लवाजमा त्यांच्या जवळ असतो. जागा मिळेल तिथे मुक्काम आणी सकाळी पुढे प्रवासाला जाणे,असा नित्यक्रम मे महीन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालत असतो, पावसाळा सुरू होताच आम्ही मंडळी गावी पोचतात.असे मत घाटमाथ्यावरुन आलेल्या मेंढपाळांनी प्रतिनिधी शी बोलतांना व्यक्त केले


थोडे नवीन जरा जुने