फूडलैंड जवळील उड्डाणपूलाचे कॉंक्रेटीकरण काम सुरु केल्याबद्दल तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने मानले सिडकोचे आभार




पनवेल दि.१३ (संजय कदम) : सिडको तर्फे कळंबोली ते तळोजा एमआयडीसी यांना जोडणा-या फूडलैंड कंपनी जवळील उड्डाणपूलाचे कॉकीटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. तळोजा एमआयडीसी मधील उद्योगांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या पुलाचे कॉंक्रेटीकरणाचे काम सुरु केल्याबद्दल तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने सिडकोचे आभार मानले आहे. 



कळंबोली ते तळोजा एमआयडीसी यांना जोडणा-या फूडलैंड कंपनी जवळील उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यामुळे तळोजा एमआयडीसीमधून निघणाऱ्या अवजड वाहनांना याचा नाहक त्रास होत होता. त्यामुळे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या उड्डाणपुलावरील काँक्रिटीकरणाचे काम जलदगतीने करावे यासाठी वारंवार पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून सिडकोतर्फे आजपासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याबद्दल तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने सिडकोचे आभार मानले आहे. 
फोटो : फूडलैंड जवळील उड्डाणपूलाचे कॉंक्रेटीकरण काम सुरु


थोडे नवीन जरा जुने