महानगर गॅस चा कामोठ्यात स्फोट





पनवेल (संजय कदम): कामोठे सेक्टर 6 मधील दुधे कॉर्नर सोसायटीमध्ये म्हणगरगॅस चे कामकाज सुरू असताना गॅस पाईप लाईन मध्ये स्फोट झाल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. या घटनेत दोन कामगार आगीत होरपळले आहेत. तसेच घरात असलेले इतर सदस्य किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


कामोठे सेक्टर अ मधील दुधे कॉर्नर सोसायटी मध्ये ही घटना आज रात्री 8 वाजता घडली आहे. या सोसायटीमध्ये महानगर गॅस पाईप लाईनच्या कनेक्शन चे काम सुरू होते. सोसायटी मधील सी विग रूम नंबर 12 मधील रहिवाशी त्रिंबक जाधव यांच्या घरात हे कनेक्शन चे काम सुरू होते. या वेळी घरात पाच सदस्य आणि दोन कामगार होते. गॅस पाईप चे कनेक्शन करताना गॅस चा मेन कॉक चालू होता. गॅस चा सप्लाय देखील सुरू होता. या वेळी घरातील पाईप चा कॉक सुरु असून गॅस लिकेज होत होता. या वेळी हे कामकाज सुरू असताना गॅस कामगारांनी शोल्डरीग चे काम सुरू केले याच वेळी लिकेज असलेल्या पाईप ने आग पकडली आणि मोठा स्फोट झाला, 



या आवाजाने इमारती मधील इतर रहिवाशियाची पळापळ सुरू झाली, हा स्फोट एवढा भयानक होता की, घरातील इतर समान आणि कामगारांना आग लागली नशीब बलवत्तर म्हणून दोन्ही कामगार हे किरकोळ होरपळले आहेत,  एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे तर दुसरा कामगार होरपळा असून त्याच्या हाताला आणि छातीला आग लागून तो जखमी झाला आहे. ही आगीची घटना कामोठे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्या नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून गॅस सप्लाय बंद केला, आणि पोलिसांनी तत्काळ जखमी कामगारांना कामोठे वसाहतीमधील रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले आहे.


थोडे नवीन जरा जुने