भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी 14 तळे महाड येथे पाण्याचा सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाला क्रांती दिन म्हणून आंबेडकरी चळवळीमध्ये ओळखले जाते . या दिनाचे औचित्य साधून स्वाभिमानी युथ रिप रिपब्लिकन पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी यांच्या संयुक्त विद्यमाने चवदार तळे महाड येथे 96 वा क्रांती दिन संपन्न झाला. याप्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी चे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब ईंदीसे उपस्थित होते .
या जाहीर सभेसाठी दोन्ही पक्षांचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील कार्यकर्ते सुरबानाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळी मध्ये कार्यरत असलेले महाराष्ट्रातील सर्व लोकशाहीर व गायक कलावंत यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाकरीता प्रमुख अतिथी म्हणून एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास निकम मुंबई प्रदेश अध्यक्ष मनोहर ओगळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी सभेला मार्गदर्शन केले. कार्यकारी अध्यक्ष विजय धोत्रे व रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे व एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी सर्व भीम भक्तांची योग्य ती व्यवस्था केली होती. या सभेनंतर भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या जाहीर सभांकरिता एक मंचाचा निर्णय घेण्यात आला होता. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने महाड येथील सर्व कार्यकर्त्यांना कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्वतोपरी सहकार्य केले. जाहीर सभेकरिता हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
महाड