माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते शेखरदादा चषक-2023 रजनी क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन.
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )श्री वरद विनायक मित्र मंडळ बोकरविडा आयोजित शेखरदादा चषक-2023 रजनी क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते झाला.
सदर प्रकाश झोतातील रजनी क्रिकेट स्पर्धा 16 मार्च ते 19 मार्च 2023 या कालावधीत बोकरविडा पेट्रोल पंप जवळील मैदानात खेळविल्या जाणार आहेत, या रजनी क्रिकेट स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या माजी आमदार मनोहरशेठ भोईर व प्रमुख मान्यवरांचा स्पर्धेचे आयोजक शेखर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच जिल्हास्तरीय महिला कब्बडी संघात निवड झालेल्या कु प्रांजली भारत पाटील ह्या मुलीचा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलायावेळी उद्योजक नरसु पाटील, सदानंद गायकवाड, सरपंच अपर्णा पाटील, स्पर्धेचे आयोजक शेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने