प्रभाग दोन मधील भाजपचा नवा चेहरा काजल महेश पाटील यांची भारतीय जनता पार्टी पनवेल ग्रामीण प्रभाग 2- महिला अध्यक्ष पदी निवड

प्रभाग दोन मधील भाजपचा नवा चेहरा काजल महेश पाटील यांची भारतीय जनता पार्टी पनवेल ग्रामीण प्रभाग 2- महिला अध्यक्ष पदी निवड; भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले नियुक्तीपत्र
पनवेल दि.०९(संजय कदम): भारतीय जनता पार्टी पनवेल ग्रामीण मंडल अंतर्गत प्रभाग 2- महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी तोंडरे गावच्या समाजसेविका काजल महेश पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तोंडरे येथील पक्षप्रवेश कार्यक्रमा दरम्यान भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. समाजसेवेची आवड असलेल्या काजल पाटील यांच्यावर पक्षाने आणखी मोठी जबाबदारी देईल अशी आशा आहे.             तोंडरे गावचे भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते महेश पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत. महिला प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची विचारधारा व कार्यपध्दतीनुसार कार्यरत राहून आपल्या परिसरात पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करून आमदार प्रशांत ठाकूर यांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचा काजल पाटील यांचा मनोदय आहे. आगामी काळात पती महेश पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत. सर्वाना सोबत घेवून पक्षाचे कार्यक्रम, उपक्रम यशस्वीपणे राबवून विविध निवडणूकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून अपेक्षेने पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी हे पद देवून त्यांच्या भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी तालुका अध्यक्ष अरूण भगत यांच्यासह तलोजा व तोंडरे मधील शेकडो पदाधिकाऱी व कार्यकर्त उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने