शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेतर्फे नवीन पदाधिकारी नियुक्त्या व मतदार नोंदणी शिबिर संपन्न.
 


जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती.


उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )रविवार दि. २६/०३/२०२३ रोजी शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेच्या वतीने समाज उपयोगी अशा नविन मतदार नोंदणी शिबीर व मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, यावेळी मार्गदर्शन करताना 


ते म्हणाले की द्रोणागिरी शहर म्हणजे उरण तालुक्यात नव्याने तयार झालेली ही वसाहत. येथे आपण शिवसेनेच्या वतीने मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करून चांगल्या उपक्रम राबविला आहे असे सांगत मनोहरशेठ भोईर यांनी सदर आयोजन केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले व जास्तीत जास्त मतदान नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी सेक्टर वाइज नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.या कार्यक्रमास तालुका संपर्कप्रमुख जे पी म्हात्रे, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघाटक अमित भगत, युवा कार्यकर्ते दीपक भोईर व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, शहर संघटक किसनशेठ म्हात्रे, उपशहरप्रमुख प्रतीक पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, युवासेना शहरप्रमुख करण पाटील,सचिव धनंजय शिंदे, फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भोईर व पदाधिकारी यांनी केले होते.


थोडे नवीन जरा जुने