तळोजा भागात घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट ३ ने केली अटक; मुद्देमाल केला हस्तगत

पनवेल दि.१६ (वार्ताहर) : तळोजा भागातील नितळस गावामध्ये घरफोडी करून ७ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. सुमीत शेळके (२४) व श्रीनाथ वाघमारे (२५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.तळोजा भागातील नितळस गावातील रामदास पाटील यांच्या घरी १ मार्च रोजी चोरी झाली होती. या वेळी रामदास पाटील व त्यांचे कुटुंबीय टेरेसवर झोपले असताना आरोपी सुमीत शेळके याने खिडकीवाटे त्यांच्या घरात प्रवेश त्यांच्या घरातून ४ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईल असा एकूण ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत तळोजा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने समांतर तपास सुरु केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने मुंबईतील सराईत चोर सुमित शेळके व श्रीनाथ वाघमारे यांना अटक केली आहे. या आरोपींवर नागोठणे, सातपाटी, केलवा, अलिबाग, दिघी या पोलिस ठाण्यात घरफोडीचे ८ गुन्हे दाखल आहेत.थोडे नवीन जरा जुने