पनवेल दि. २० ( वार्ताहर ) : कामोठे रहिवासी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ कामोठे, जय हरी महिला मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त 22 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेत पंचक्रोशीतील वारकरी मंडळे आणि ढोल-ताशा पथके सहभाग घेणार आहेत.
यावेळी पोपट आवारी, गोरक्षनाथ घाडगे महाराज, बाळासाहेब मुंढे, रोहिदास ढोमे, अनंत वारे यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित राहणार आहेत. शिवशंकर मंदिर से. -८ येथून शोभा यात्रेला सुरुवात होणार असून रयत हायस्कूल, ऐश्वर्या हॉटेल, सेंट्रल बँक चौक, गोकूळ डेअरी, मनमोहन मिठाई चौक, सत्यकेतु पोलिस स्टेशन कामोठे, शिवसेना ऑफिस, त्रिमुर्ती चौक, एम. एन. आर. चौक, शिवशंकर मंदिर से.-८ येथे समारोप होणार आहे. पारंपारीक पोशाखात बहुसंख्येने सहभागी होऊन नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
पनवेल