डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे उरण मध्ये स्वच्छता अभियान.


उरण दि 1(विठ्ठल ममताबादे )

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या वतीने पदमश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि 1 मार्च 2023 रोजी सकाळी 7.30 ते 11 वाजेपर्यंत महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित उरण शहरातील शासकीय कार्यालय व प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आले.


उरण शहरातील एकूण 9 सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी सदर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच उरण शहरातील विविध ठिकाणी रस्ते सफाई करण्यात आली.सदर स्वच्छता अभियानासाठी श्री बैठकीतील 1876 सदस्य उपस्थित होते.तसेच श्री बैठकी सदस्या व्यतिरिक्त विविध सरकारी कार्यालयांचे 20 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सदर स्वच्छता अभियांतर्गत अंदाजे 13.8 टन ओला कचरा व 23.16 टन सुका कचरा असा एकूण 36.96 टन कचरा काढण्यात आला.


थोडे नवीन जरा जुने