शिवजयंती च्या निमित्ताने ,प्रेरणा मित्र मंडळ माजगांव यांच्या वतीने रक्त दान शिबिरांचे आयोजन








काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १० मार्च, प्रेरणा मित्र मंडळ माजगांव यांच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले,यावेळी विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले.सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचे पूजन झाल्यानंतर सत्यनारायण यांची पुजा आयोजन करण्यात आली


.नंतर रक्त दान शिबीर एम.जी.एम.कामोठे न्यू मुंबई यांच्या माध्यमातून घेण्यात आले.रक्त दान हे सर्वात श्रेष्ठ दान असे संबोधले जात असल्यामुळे,रक्त आपण निर्माण करु शकत नाही,मात्र ते दान करु शकतो या विचारांतून प्रेरणा मित्र मंडळ व ग्रामस्थ महिला मंडळ माजगांव यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले.यावेळी माजी आमदार मनोहर भोईर यावेळी उपस्थित होते.



               रक्त दान करुन आपण एखाद्याचे प्राण वाचू शकतो हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम तरुण वर्गांनी हाती घेण्यात आले.शिवजयंती च्या माध्यमातून रक्त दान शिबीर गेले २० वर्ष हाती घेत असून, या माध्यमातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.यावेळी शेकडोहून अधिक तरुण वर्गांनी रक्त दान केले.समाज्यामध्ये उत्तम संदेश पोहचावे या विचारांतून हे उपक्रम तरुण वर्ग राबवित आहे.


            त्याच बरोबर महिला वर्गांसाठी हळदि कुंकु या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी सोहळा,व भव्य मिरवणूक ढोल ताश्यांच्या गजरात काढण्यात आली.त्याच बरोबर महाप्रसाद म्हणून ठेवण्यात आले होते.रात्री जागर भजन ग्रामस्थ मंडळ माजगांव यांच्या माध्यमातून करण्यात आले. 


              यावेळी एम.जी.एम.कामोठे न्यू मुंबई डॉक्टर डॉ.राजेश आतर्डे, कोमल पडवल,मनोज जाधव,रोहित सरदार,यशवंत राठोड,त्याच बरोबर त्याच्या समवेत त्यांचे सहकारी उपस्थित होते हे कार्यक्रम प्रेरणा मित्र मंडळ माजगांव अध्यक्ष - ,उपाध्यक्ष - यांच्या माध्यमातून करण्यात आले.



 



थोडे नवीन जरा जुने