आजी आजोबा दिवस साजरा.उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )
कै गो.ना.अक्षीकर विद्या संकुलातील जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये ग्रँड पेरेंट्स डे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लायन स्वप्ना सदानंद गायकवाड, शाळेचे स्कूल कमिटी चेअरमन सदानंद गायकवाड, नीलिमा नारखेडे मुख्याध्यापिका मराठी माध्यम,माजी शिक्षक पी ए पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे आजी आजोबा मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.


थोडे नवीन जरा जुने