इसम बेपत्ता

पनवेल दि.१९ (संजय कदम) : राहत्या घरातून ठाणे येथे जावुन येतो असे सांगून दुचाकी घेऊन घराबाहेर पडलेला इसम घरी न परतल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.        नामदेव गंगाराम दळवी असे या इसमाचे नाव असून त्याचे वय ४१ वर्ष, चेहरा गोल, रंग सावळा, उंची ५ फुट ८ इंच, डोक्याचे केस काळे, डोळे काळे, नाक जाड सरळ, अंगाने जाड, तसेच अंगात पांढन्या रंगाचा फुल बाहयाचा शर्ट, निळया रंगाची जिन्स पॅन्ट व पायात काळया रंगाचा बुट घातलेले आहे. तरी या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार बाबासाहेब शिरसाठ यांच्याशी संपर्क साधावा.थोडे नवीन जरा जुने