धर्मवीर चषकाचे आयोजन. उरण, दि 18 (विठ्ठल ममताबादे ) शिवसेना शाखा जसखार यांच्या वतीने प्रकाश झोतातील भव्य ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन श्री रत्नेश्वरी देवी मंदिर मैदान,जसखार,ता. उरण,जि. रायगड येथे 19 मार्च 2023 ते 21 मार्च 2023 या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर धर्मवीर चषकाचे उदघाटन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे,खासदार श्रीरंग बारणे,आमदार महेंद्र थोरवे,शिवसेना प्रवक्त्ते - नरेश महस्के, राष्ट्रीय कोअर कमिटी सदस्य रुपेश पाटील , उपजिल्हाप्रमुख - अतुल भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


थोडे नवीन जरा जुने