ग्रामीण भागात घरघुती मसाला बनविण्याची लगबग,मिरची चे दर वाढल्यामुळे खिशाला बसत आहे झळ
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २७ मार्च , मसाला हा स्वयंपाक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्यामुळे पावसाला सुरु होण्या अगोदर वेध लागतात.सध्या मिरचीचे दर वाढले असले तरी सुद्धा पावसाळ्यापुर्वी मिरची खरेदि करावी लागते.यामुळे सध्या मिरची खूप तिखट झाली असे ग्राहक म्हणत आहे.ते घरघुती मसाला बनवण्याचे हा मसाला बाजारात उपलब्ध होत असला तरी सुद्धा ग्रामीण भागातील घरघुती मसाला मोठ्या प्रमाणात बनविण्यात येत आहे. 


 हा मसाला रुचकर आणि चवदार असल्यामुळे हा मसाला बनविण्यासाठी ग्रामीण भागात सध्या लगबग सुरु झाली आहे.पावसाला सुरु होण्या अगोदर घरघुती मसाला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बनविला जातो.पावसाळी मिळणा-या ओळी मासळी,चिंबोरी ,मुठे यांचे स्वयंपाक बनविण्यासाठी योग्य असल्यामुळे शिवाय शिवाय विशिष्ट्य चव,गंध येत हा मसाला बनविण्याचा कल ग्रामीण भागातील नागरीकांचा मोठ्या प्रमाणात आहे. तसेच बाजार पेठेत लवंगी मिरची ( तिकीट )आणि बेडकी मिरची,गंटुर, शंकेश्‍वरी,पट्टी, मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने हि मिरची खरेदी करण्याचा कल मोठ्या प्रमाणात दिसत आहे.हि मिरची घरी घेऊन तिला उन्हामध्ये सुकवली जाते.नंतर मसाला बनविण्यासाठी गिरणी मध्ये नेण्यात येत असतो.


यामुळे खेडगावात मसाला दर वर्षी बनवीत असल्यामुळे प्रत्येकांच्या अंगणात मिरची वाळत ठेवल्याचे दृश्य अनेक ठीकाणी पहावयास मिळत आहे.
थोडे नवीन जरा जुने