संतोष यांच्या सुरेल स्वरांनी पनवेलकर रसिक मंत्रमुग्ध
पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून कोशिश फौंडेशन तर्फे दर शनिवारी पनवेलकर रसिकांना उत्तम संगीत पर्वणी मिळत असते. आज सुप्रसिद्ध गायक रायगड भूषण संतोष पाटील यांचे उत्तम गायन संपन्न झाले. पनवेल दिल ऐतिहासिक वडाळे तलावाच्या शेजारी हा कार्यक्रम संपन्न झाला. राग ललत मधील "जोगीया मोरे घर" या सुप्रसिद्ध बंदीशीने सुरवात करून एक प्रसन्न वातावरण निर्मिती केली. त्यानंतर "आधी रचिली पंढरी" आणि "इंद्रायणी काठी" हे सुप्रसिद्ध अभंग सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. अबीर गुलाल हा अभंग इतका छान सादर झाला की एका संगीत रसिकाने मला जणू विठ्ठलच भेटल्याचा भास झाला अशी प्रतिक्रिया दिली. कार्यक्रमाचा शेवट "अवघा रंग एक झाला" ही भैरवी सादर करून मैफिलीची सांगता केली.
मैफिलीला अतिशय उत्तम साथसंगत हार्मोनियम वर अथर्व देव व तबल्यावर आदित्य उपाध्ये या दोन गुणी युवा कलाकारांनी केली. हे दोघे अतिशय उत्तम मेहनती असे कलाकार आहेत आणि त्याचं सांगितिक भविष्य नक्कीच उज्वल आहे यात शंका नाही अशी प्रतिक्रिया मा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केली.
माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी प्रमुख अतिथी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील व संस्कार भारती उत्तर रायगडचे महामंत्री ऍड. अमितजी चव्हाण ह्यांचे स्वागत केले व ह्या मान्यवरांच्या हस्ते गायक कलाकारांचा सन्मान करण्यात आला. चंद्रकांत ताम्हनकर, महेश पेंडसे,सतीश बापट, अविनाश देव चंद्रकांत मने,चैत्राली देसाई , प्रधान सर, मनोहर लिमये, रोहित आटवणे, अनिरुद्ध पेंडसे, सौ. संध्या घाडगे असे अनेक गुणी कलाकार व जाणकार रसिक मैफिलीस उपस्थित होते. पनवेल मध्ये अश्या सुरेल सकाळ मैफिली होत आहेत आणि लोक उत्तम दाद देत आहेत यातूनच आपले शास्त्रीय संगीत पुढे जाईल आणि उत्तम कलाकार पुढे येतील यात शंका नाही. अभिषेक पटवर्धन यांनी ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पाहिले. पनवेलच्या ऐतिहासिक वास्तू असलेल्या वडाळे तलावाचे सौंदर्य आजच्या कार्यक्रमाने अधिक खुलून आले
. दर शनिवारी पनवेलकर रसिकांना ही उत्तम संगीत पर्वणी आहे आणि त्याचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढतो आहे. सदर होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ९७६९४०९१९४ हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये 'सांस्कृतिक कट्टा' या नावाने save करून ह्यावरआपण WhatsApp वर 'hi' पाठवावा. असे केल्यास आपल्याला याच कार्यक्रमांची नव्हे तर पनवेल महापालिका क्षेत्रात होणाऱ्या सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती आपल्यापर्यंत निःशुल्क पोहोचवली जाईल असे आवाहन अभिषेक पटवर्धन यांनी केले.
Tags
पनवेल