लोकलमधून पळवली बॅगपनवेल दि.२२ (वार्ताहर) : सीएसएमटी पनवेल लोकलने प्रवास करत असताना रॅकवर ठेवलेली रोखरक्कमेसह मोबाइल व इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. कामोठेमधील प्रतीक जैन सीएसएमटी पनवेल लोकलने प्रवास करत असताना त्याने ९० हजार रुपये किमतीचे दागिने, मोबाइल व इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग रॅक वर ठेवली होती. मात्र बेलापूरजवळ लोकल आल्यानंतर अज्ञात चोरट्याने हि बॅग जागेवर नसल्याचा प्रकार प्रतीक यांच्या निदर्शनास आला. यासंदर्भात पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने