आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव बचावला




पनवेल दि.१९ (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे चालती ट्रेन पकडण्याच्या नादात खाली पडणाऱ्या प्रवाशाचा जीव बचावला आहे.  



 पनवेल रेल्वे स्थानकात चालती नेत्रावती एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा हात सटकला तो खाली पडणार इतक्यात तिथे उभे असलेल्या आरपीएफ जवानाने धाव घेत प्रवाशास आठ ढकलून ट्रेनमध्ये टाकले. त्यामुळे त्या प्रवासाचा जीव वाचला आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे. 




थोडे नवीन जरा जुने