महिला दिनानिमित्त महिला वकील वर्गाकडून आनंदोत्सव साजरा
पनवेल दि. १२ (वार्ताहर) : पनवेल न्यायालयातील महिला वकील वर्गाकडून जागतिक महिला दिनाचा औचित्य म्हणून वकील क्षेत्रात काम करताना येणारा ताण कमी करता यावा व तणावमुक्त आयुष्याच्या अनंद घेता यावा म्हणून नृत्य, कविता सादरीकरण इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून पनवेल येथील तथास्तु हॉल येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. अगदी कार्यालयीन दिवसाच्या निमित्ताने सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमांचा आयोजन केलं जातं. परंतु कार्यालयीन दिवसांमध्ये मनसोक्तपणे आनंद साजरा करण्यावरती काही मर्यादा असतात. अगदी हीच बाब लक्षात घेता महिला दिन अतिशय मनोरंजनाच्या माध्यमातून कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने अगदी मनसोक्त या दिवसाचा आनंद घेता यावा म्हणून पनवेल येथील न्यायालयातील महिला वकील वर्गाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यानिमित्ताने मोठ्या संख्येने पनवेल न्यायालयातील महिला वकील वर्ग उपस्थित होता.


थोडे नवीन जरा जुने