उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषदेच्या महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नारायण विष्णू धर्माधिकारी कन्याशाळा क्र.२ येथे "माई" फाउंडेशन - एन.जी. ओ. उरण संस्थापक आणि संचालिका - श्लोक निखील पाटील व
कु. जोई निखील पाटील यांच्या माध्यमातून शाळेतील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे आई व त्यांची मुलगी हे गेली 3 वर्षा पासुन हे कार्य करत आहेत."मा" - म्हणजे आई म्हणून त्यांनी या फाउंडेशनचे नाव "माई" असे ठेवले.
व आई प्रमाणे आपल्या इतर मुलींची आणि मुलांची मदत म्हणून हे कार्य सुरू केले.यावेळी श्रीमती सलिमां शेख( शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष), रत्ना शिवाजी गवळी प्राचार्या, अमिता पिंपळे, अनिता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होत्या.
Tags
उरण