उरण शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण अल्पसंख्याक सेलची बैठक संपन्न.
उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )दिनाकं 14 मार्च 2023 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क कार्यालय, विमला तलाव, उरण शहर येथे उरण अल्पसंख्याक सेलची बैठक संपन्न झाली.


 यावेळी उरण शहरातील बोरी पाखाडी, भंगारपाडा, मुस्लिम मोहला, व कासमभाट विभागातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचा जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी भगवी शाल अर्पण करून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात स्वागत केले. या बैठकीत नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली 

यामध्ये बोरी पाखाडी-भंगारपाडा क्षेत्रासाठी शाखाप्रमुख पदी नियाज भाटकर, उपशाखाप्रमुख पदी इम्रान खान, गटप्रमुख पदी समीम खान, महिला शाखासंघटिका हसीना सरदार, उपशाखासंघटिका रुकसाना सय्यद, मुस्लिम मोहला क्षेत्रासाठी शाखाप्रमुख पदी कफील फसाठे, उपशाखाप्रमुख पदी इयज सत्तर शेख, गटप्रमुख साहिल सुलेमान खान, कासमभट क्षेत्रासाठी शाखाप्रमुख पदी सहीम शेख, उपशाखाप्रमुख शाहरुख गडी व गटप्रमुख उमेश भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली.


 यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की आज मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज हा पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे, उरण मध्ये आपण मोठ्या संख्येने आमच्याकडे सहभागी होत आहेत, त्यामुळे येणाऱ्या उरण नगरपालिकेची निवडणूकित व विधानसभा निवडणुकीत आपण शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षासोबत राहाल याची मला पूर्ण खात्री आहे.या कार्यक्रमास उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, महिला उपशहरप्रमुख रझिया शेख, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अन्वर कुरेशी, विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, तालुका अध्यक्ष परेश मेहता, तालुका सचिव मुस्तफा सय्यद,महिला तालुका अध्यक्ष हुसेना शेख, शहर अध्यक्ष मुमताज भाटकर , 

तालुका उपाध्यक्ष रुबिना कुट्टी, शहर उपाध्यक्ष सायरा खान, जेष्ठ कार्यकर्ते इरफान मुल्ला, सय्यद पटेल, गुलजार भाटकर, शाखाप्रमुख समीम शेख, इस्माईल शेख, रफिक मुल्ला, युवासेनेचे अरहम शेख,महमंद शेख,नबेल भाटकर व कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने