पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये येत्या शनिवार दिनांक ४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ३. ३० वाजता सिंधी पंचायत हॉल, विश्राळी नाका, पनवे येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शिवसेना व संपर्क नेते कोंकण विभाग सुभाष देसाई, शिवसेना माजी आमदार अणुशक्ती विधानसभा तुकाराम काते, शिवसेना उपनेत्या मीना कांबळी, माजी आमदार विशाखा राऊत, शिवसेना नगरसेविका तथा संपर्क संघटिका मा. तृष्णा विश्वासराव, युवासेना कार्यकरणी सदस्या राजोल पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड - पनवेल शिरीष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर मेळावा पार पडणार आहे.
तरी या मेळाव्यास पनवेल विधानसभा मतदार संघातील उपजिल्हा प्रमुख, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, तालुका संपर्क प्रमुख, महानगर प्रमुख, महानगर समन्वयक, सर्व तालुका प्रमुख, सर्व उपतालुका प्रमुख, सर्व उपमहानगर प्रमुख व संघटक, सर्व शहर प्रमुख, सर्व उपशहर प्रमुख व संघटक, सर्व विभाग व उपविभाग प्रमुख, सर्व शाखा व उपखा प्रमुख, सर्व बूथ प्रमुख, सर्व गट प्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थामधील सर्व शिवसेना लोकप्रतिनिधी, सर्व निमंत्रित पदाधिकारी, सर्व सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, सलग्न संघटनेचे सर्व पदाधिकारी, सोसायटी सदस्य तसेच पुरुष व महिला शिवसैनिकांनी सदर मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गुरुनाथ पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
Tags
पनवेल