तालुक्यात होळी, धुलिवड हा सण साजरा


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी              
पाताळगंगा :८ मार्च, बुरा ना मानो होली है! असे म्हणत ग्रामीण भागात होळी आणी धुलवड हा सण ,तालुक्याच्या ठीकाणी साजरा करण्यात आला.यावेळी होळी लावण्यासाठी सुकलेले.झाड घेऊन तीच्या भोवती शेणी गवत,पेंढा,लाकडे रचून होळी सजविण्यात आली.प्रथम होळी ला पुरणपोळीचा,गोड पोळी ,पापड,खरोडी अशा विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य या होळीला प्रदान करण्यात आला.ईडा पिडा टळू दे पुन्हा एकदा बळीच राज्य येवुदे, शेतकरी सुफलाम् होवू दे असे म्हणत एकमेकांना होळीच्या आणी धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या. होळी लावण्याची भारतीय संस्कृती असून आपल्या पूर्वजांची वर्षभरातील वेगवेगळे ऋतू आणि राहणीमानाच्या अनुसरुन सणांची निर्मिती केली आहे.यामूळे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला 'होळी पौर्णिमा' म्हणून ओळखले जाते.होळिच्या दुस-या दिवशी धुलवड म्हणजे रंगांची उधळण करुन आनेकांनी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देत.असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठीकाणी पहावयास मिळत होते. ऋतु मानानुसार थंडीचा महिना संपून,आता फाल्गुन महिन्यानंतर वसंत ऋतू आणि पुढे ग्रीष्म ऋतूची सुरुवात होते. त्यामुळे थंडी होळीच्या आगीत जळून गेली, असे मानले जाते.आणी येणारा ऋतु हा उष्णतेचा असून या पासून आपल्या शरीराचे संवर्क्षण व्हावे हाच या मागील उद्देश आहे.
थोडे नवीन जरा जुने