कॅप क्लबच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयॊजन


पनवेल दि.१८ (संजय कदम) : पनवेल शहरातील नामांकित मल्टी स्पोर्ट टर्फ असलेले कॅप क्लबच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त १९ मार्च रोजी ‘बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे.पनवेल शहरात कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीमध्ये कॅप क्लबच्या मल्टी स्पोर्ट टर्फमध्ये विविध खेळांचे सामने होत असतात. यामध्ये तरुणांसह, आबालवृद्ध, महिलावर्ग सहभाग घेऊन खेळाचा आनंद घेत असतात. अश्या लोकप्रिय व तरुणांच्या पसंतीच्या कॅप क्लबच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त १९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीमध्ये ‘बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, मा.सभागृह नेते परेश ठाकूर, मा. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा देणार आहे. तरी या स्पर्धेनिमित्त नागरिकांनी उपस्थित राहून खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन कॅप क्लबचे ऍड मनोहर सचदेव यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने