पनवेल दि.०३ (संजय कदम) : प्लॉटवाले या फर्मद्वारे पनवेलसह नवी मुंबई, कर्जत परिसरात फार्महाऊससाठी आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून देणाऱ्या प्लॉटवाले या फर्मचे मालक असलेले राम राठोड आणि सुभाष कोटियन या होतकरू उद्योजकांनी करंजाडे नोड मध्ये सेक्टर 2 ए भूखंड क्रमांक 4 वर फ्लॅटवाले हा नवा गृहप्रकल्प सुरु केला आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले.
या भूमिपूजन सोहळ्याला शंभूराज देसाई यांच्यासह आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील, सांगली मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आदींसह होमट्के ग्रुपचे संचालक उपस्थित होते. युवा उद्योजक राम राठोड आणि त्यांचे सहकारी रियल इस्टेट क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण करीत आहेत. अशा युवा उद्योजकाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मी स्वतः या याठिकाणी उपस्थित राहिलो असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी आहे. भव्य व वाजवी दरात गृहप्रकल्पाद्वारे गरजुंना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा राम राठोड आणि सुभाष कोटियन यांचा मानस आहे. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या या प्रकल्पात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत
. ज्या पद्धतीने प्लॉटवाले या फर्मद्वारे नवी मुंबई, खालापुर, कर्जत, पनवेल परिसरात अनेक जणांचे सेकंड होमचे स्वप्न आम्ही साकारले आहे. त्याच धर्तीवर गरजूंचे पनवेल, नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे स्वप्न आम्ही आमच्या प्रकल्पाद्वारे साकारणार असल्याच्या भावना राम राठोड यांनी व्यक्त केल्या.
Tags
पनवेल