महिला वर्गांनी केली होलीका देविची पुजा






काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ६ मार्च, खालापूर तालुक्यातील आंबिवली येथे महिला वर्गांनी होळी का मातेची पुजा करण्यात आली. होळीचा सण असल्यामुळे तरुण वर्ग लहान मुले या मध्ये सहभागी झाले होते.जंगलात जावून होळी साठी सुकलेले झाड लावून होळी रचण्यात आली.महिला वर्गांची लगबग सुरुच होती.घरामध्ये गोड धोड पुरण पोळी अदि नैवेद्य हे होळी ला अर्पण करण्यात आले.यावेळी महिला वर्गांनी आरती घेवून होळीची पुजा करण्यात आली.


                 होळीच्या सणाच्या निमित्ताने आणी होळीचे दर्शन घेण्यासाठी नवविवाहित मुलीने आपल्या पतीला घेवून होळीचे दर्शन घेतले.यावेळी बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.होळी रात्रीचे बारा वाजता प्रज्वोजित करणार येणार असल्यामुळे महिला वर्गांनी नैवेद्य दाखविण्यात आले.होळी आणी दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असा दुहेरी संगम होत असल्यामुळे बाहेर गावी राहत असलेले कुटुंब या सनाच्या निमित्ताने आपल्या गावी आल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.



                 कोणतेही सण वर्षातून एकदाच येत असल्यामुळे गावापासून नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेल्यामुळे आज होळीच्या सणानिमित्ताने आपल्या घरी आले होते.यावेळी एकत्र बसून पंगत जेवणांचा आनंद घेण्यात आसतो.इतर दिवशी घरामध्ये माणसे कमी असतात.मात्र सणांच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र आल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाल्यांचे पहावयास मिळाले.यावेळी होळी रचण्यासाठी गवत,पेंढा,मोठ मोठे लाकूड ह्या होळीच्या ठिकाणी रचण्यात आले होते.संपूर्ण या दिवसांमध्ये होळीमुळे अनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.


 
थोडे नवीन जरा जुने