शाळकरी मुलगा स्कूल व्हॅनमधून पडून जखमी







पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : तळोजा से २० फेज- ०२ याठिकाणी राहणारा एका ९ वर्षीय शाळकरी मुलगा स्कूल व्हॅनमधून पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या मुलाचे नाव आबान राय (९ वर्षे) असे असून शिक्षिका असलेल्या त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून झोया ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्कूल व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



                   अबान राये असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. अबान हा तळोजा फेज -१ मधील कालसेकर इंग्लिश स्कूलमध्ये तिसऱ्या इयत्तेत शिकतो. अबान हा झोया ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्कूलमधून तक्रारीवरून शाळेतून ये जा करतो. दरम्यान तो स्कूल व्हॅनमधून खाली उतरत असतांना, त्याच्या बॅगच्या हँडल अडकल्याने तो घसरून खाली पडून या घटनेत तो जखमी झाला. या प्रकरणी अबान याची आई शमीरा राय यांनी दिलेल्या स्कूल व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

.
थोडे नवीन जरा जुने