नेत्रदानाचा व रक्तदानाचा वाढदिवसानिमित्त कामोठ्यात निर्धार





पनवेल दि. २० ( वार्ताहर ) : निर्धार सामाजिक संस्था आणि झेंडा सामाजिक संस्था सयुंक्त विद्यमाने समाजसेवक निलेश आहेर व विशाल बेलकर यांच्या वाढदिवसानिम्मित कामोठे येथे रक्तदान शिबिराचे व नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 85 रक्तदात्यांची रक्तदान करून गरजूंना मदतीचा हात दिला. हे रक्त श्री साई ब्लड बँक रक्तपेढीकडे सोपविण्यात आले आहे.



           वाढत्या महामारी व इतर आजारांमध्ये अनेकांना रक्ताची गरज भासत आहे. अशावेळी एखाद्या रुग्णाला रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने अनेक जण रक्तदानासाठी पुढे येत आहेत. त्यानुसार वाढदिवसाचे औचित्य साधुन कामोठे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.



 विविध संस्था व मंडळे यांचे सहकार्य नेत्रदान शिबिराला व रक्तदान शिबिराला मिळाले. हे रक्त श्री साई ब्लड बँक संकलित करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य जय पावणेकर, अजित पवार, अशोक पावणेकर, किरण भोसले, अभिषेक शिंदे व तसेच श्री स्वामी सेवा केंद्राचे सेवेकरी यांनी सेवा देऊन कार्यक्रम यशस्वी केला.



फोटो - 
थोडे नवीन जरा जुने