महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचा विमानाने गोवा अभ्यास दौरा

24 मार्चला पनवेल येथून होणार रवाना, अनेकांचे प्रथमच विमानप्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण 
पनवेल / प्रतिनिधी 
 महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या स्थापनेनंतर धडाक्यात कार्यक्रम सुरु आहेत. सामाजिक राजकीय क्षैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन काम करत आहे. पत्रकारांच्या अनेक संघटना अस्तित्वात आहेत मात्र महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन या संस्थेत नव्याने पत्रकारिता करणार्‍या बंधू - भगिनींना देखील प्रथम सामावून घेण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. नव्याने पत्रकारिता क्षेत्रात आल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, काम करताना अनेकदा खच्चीकरण झाल्यासारखे वाटते त्यातच कमाईचे स्रोत अत्यल्प असल्याने लाईट बिल भरणे देखील कधी कधी मुश्किलीचे होऊन जाते. महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन संघटनेने या सर्वांची दखल घेत शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी विमानाने गोवा अभ्यास दौरा आयोजित केला आहे.
 प्रथमच विमानाने प्रवास करणार्‍या सदस्यांच्या इच्छेनुसार या दौरा आयोजित करण्यात आला असून विमानात बसणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व त्याच हेतूने आम्ही हा गोवा दौरा आयोजित केला असल्याचे अध्यक्ष केवल महाडिक, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव संतोष सुतार, सहसचिव शैलेश चव्हाण, कार्याध्यक्ष संतोष भगत, खजिनदार सोनल नलावडे यांनी माहिती देताना सांगितले.


थोडे नवीन जरा जुने