रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.


उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व उलवे व्यापारी असोशियन यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन उलवे रोड मध्ये करण्यात आले होते. 


याप्रसंगी प्रमुख अतिथी रवी पाटील अध्यक्ष साई देवस्थान वहाळ, न्हावा सेवा पोलीस स्टेशनचे अधिकारी शिंदे, ज्येष्ठ पत्रकार महादेव पाटील,आरएसएस संघ अध्यक्ष गव्हाणे शाम त्रिपाठी, वहाळ तंटामुक्ती अध्यक्ष रामदास नाईक, मनोज शर्मा,गुलाब सिंग चौधरी, भरत नाईक तसेच स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर टीम आणि रक्तदाते यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


थोडे नवीन जरा जुने