दलित पॅंथरचे नेते भाई सांगारे यांचा 24 वा स्मृतीदिन संपन्नदलित पॅंथरचे नेते भाई सांगारे यांचा 24 वा स्मृतीदिन संपन्न 
पनवेल दि.०२ (संजय कदम) : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या अध्यक्षतेखाली दलित पॅंथरचे नेते भाई सांगारे यांचा 24 वा स्मृतीदिन वडाळा येथे पक्षाच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाला.              भाई संगारे हे मनोज संसारे यांना आपला मानसपुत्र मानत होते. भाई संगारे यांनी आपल्या जीवनात अनेक आंबेडकरी चळवळीचे नेते व कार्यकर्ते घडवले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित केले होते . त्यांच्या २४ व्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाकरिता महासचिव अशोक वाघमारे, संघटक भगवान गरुड, वरळी विभागाच्या अध्यक्षा रेणुका तांबे, युवा नेते अनिकेत संसारे, रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व भाई संगारे यांच्या जीवन चरित्राची आणि त्यांच्या कार्याची माहिती उपस्थित कार्यकर्त्यांना करून दिली.


थोडे नवीन जरा जुने