आमदार महेंद्र थोरवे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसी उरण मतदार संघातून 50 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

उरण दि 8(विठ्ठल ममताबादे ) उत्तर रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा पन्नासावा वाढदिवस पोसरी कर्जत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले,आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. 


यावेळी उरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संघटक कृष्णा बा. पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली उरण तालुका व उरण मतदारसंघातून विविध विभागातून विविध सामाजिक पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश प्रक्रियेत उरण शिवसेना तालुकाप्रमुख अदिनाथ भोईर, गव्हाण विभागीय प्रमुख, प्रभाकर पाटील, संपर्कप्रमुख राजन म्हात्रे, जासई विभाग प्रमुख वैभव पाटील, रोहन कडू, चिरनेर विभागीय प्रमुख विजय पाटील, सचिन पाटील, तरघर शाखाप्रमुख संतोष मोकल, मोहा शाखाप्रमुख धनंजय कोळी, सह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.


 तर उलवे नोडमधील विविध व्यवसाया निमित्त स्थायिक झालेल्या उत्तर भारतीयांनी संतोष चौधरी, दत्ता ओझा, व शुभम दुबे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले आहे.तर मतदार संघाचे संघटक कृष्णा पाटील यांनी स्वागत करून प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


थोडे नवीन जरा जुने