जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते पारगाव येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न


जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते पारगाव येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )रवीवार दिनाकं 02 एप्रिल 2023 रोजी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष )जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते पारगाव गावातील सिडकोच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला,


 यामध्ये पारगाव गावातील तलाव पाली ते महेश मेहेर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण व दिलखुश दळवी ते राजाराम तांडेल घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण या विकास कामांचे भूमिपूजन माजी आमदार मनोहरशेठ भोईर व काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले की, जीवनाच्या शेवट पर्यंत समाजाची सेवा करत राहीन व विकासकामांच्या आड कुठलीही अडचण आली तरी आपण सिडकोच्या माध्यमातून ती सोडविनाचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचा यावेळी त्यांनी सांगितले.कन्हैय्या पाटील, सरपंच अहिल्या नाईक, अभियंता विनायक पाटील, केसरीनाथ पेनकर, मिलिंद तारेकर, कैलास तारेकर,केतन तारेकर, रोहिदास म्हात्रे,केवल तारेकर, नंदकुमार म्हात्रे,रोहन तारेकर,समीर म्हात्रे, वैभव म्हात्रे, अनिता म्हात्रे, स्वप्नील तारेकर,सचिन पाटील, प्रशांत मेहेर,रमाकांत तारेकर, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर मोकळ, कर्मचारी संतोष देवळे व कार्यकर्ते उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने