हत्या की आत्महत्या ? चर्चेला उधाण.
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )दिनांक ३० मार्च २०२३ रोजी उरण भवरा येथील तलावात रात्री १.३० च्या सुमारास रस्त्यावर जाणाऱ्या एका इसमाला तलावात मृतदेह तरंगत आसल्याचे दिसून आले असता त्यांनी त्वरित ११२ या क्रमांकावर पोलिसांबरोबर संपर्क साधून या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले . मृतदेह तलावात असल्याकारणाने पोलिसांनी सिडको अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह तलावाच्या बाहेर काढला,असता सदरचा मृतदेह एका तरुणीचा असल्याचे समजले.या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून तरुणीची हत्या की आत्महत्या याबाबत जनतेमध्ये चर्चेला उधाण आले आहे . सदरचा मृतदेह तलावातून बाहेर काढल्या वर आजूबाजूला पोलिसांनी चौकशी केली असताना या मृत तरुणीचे नाव मनाली दत्तात्रेय जाधव असल्याचे समजले
. तिचे वय ३० वर्ष असून ही तरुणी भवरा येथील स्थानिक रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .तरी सदर तरुणीने आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज असला तरी मनालीची हत्या की आत्महत्या याबाबत परिसरात मात्र चर्चेला उधाण आले आहे. या घटनेचा अधिक तपास उरण पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मोरा सागरी पोलीस ठाण्यातील हवालदार एस आर.वसावे व त्यांचे सहकारी करीत आहेत.
Tags
उरण